Regularity and Irregularity in Handwriting.

अक्षरावरून स्वभाव विश्लेषण हे विज्ञान आणि कलेचे मिश्रण आहे! प्रत्येकाची स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची पद्धत ही खूप खोलात जाऊन, चाचणी केल्यावरच निश्चित करता येते. यात तपशीलवार गणती आणि मिळवलेल्या माहितीची व्यवस्थित योजना करणे गरजेचे असते. हे झाल्यावरच व्यक्तीचा प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव लक्षात येतो. Graphology चा कलेच्या माध्यमातून विकास होतानाही दिसतो. अक्षरतज्ञ हा निरीक्षणांमधून आणि छोट्या छोट्या सांकेतिक गुणांमधून एक व्यक्तिमत्त्व रेखाटत असतो. म्हणून मला वाटतं, विज्ञान आणि कलेच्या संगमातून एक अचूक व्यक्तिमत्त्व निर्माण होताना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. ही व्यक्तिमत्त्व रेखाटण्याची कला, खूप वर्षांच्या अनुभवातून आणि स्वतःला व इतरांना समजून घेण्यातून वाढत जाते.

आज आपण Regularity आणि irregularity म्हणजे काय पाहूया. (म्हणजेच नियमित व अनियमित अक्षर)

एकंदर लांबून कागदाकडे पाहिल्यावर ते एकसारखं लिहिलेलं आहे की त्यात भरपूर बदल होत आहेत हे कोणालाही समजत. या भरपूर बदलांमध्ये आकार कमी जास्त होणं, अक्षरांमधील, 2 ओळींमधील अंतर असमान असणं, अक्षर उजवीकडे किंवा डावीकडे झुकलेलं असणं यासारख्या गोष्टी असतात. यावरून आपण ते नियमित, एकसलग, एकसारखं आहे की अनियमित हे ठरवू शकतो.

उदाहरण द्यायचे झाले तर नियमितपणा असलेले, मोठे, सुसंघटित अक्षर; आत्मविश्वास, स्वतःला उत्तमरीत्या व्यक्त करता येणे, उत्साह, चैतन्य आणि कामसुपणा असलेले व्यक्तिमत्त्व दाखवते.

हेच मोठे अक्षर जर अनियमित असेल तर उद्धटपणा, तुटक स्वभाव, असभ्य बोलणं आणि मन मानेल तसं वागणारी व्यक्ती म्हणून व्यक्तीचित्र रेखाटते.

regularity

Regularity in Writing

Regularity in Handwriting:

हे sample regularity चं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.

कागदाकडे पहाताचक्षणी आपल्याला एकंदर नियमितपणा लक्षात येतोच. ज्याच्या हस्ताक्षरामध्ये सुसंगती आणि निश्चीतपणा असतो, एकसारखं लिहिण्याचं सातत्य असतं, त्या व्यक्तीमध्ये विचार आणि वागण्यामध्ये निश्चितता दिसते. त्यांच्या चालण्यामध्ये आत्मविश्वास जाणवतो. बोलण्यामध्ये सुसंगतता असते. जर त्या व्यक्तीने लिहायला पेन उचलला तर, अक्षरात एक स्थिरता दिसते. सगळीच अक्षर एकसारखी, टंकलेखन केल्यासारखी नक्कीच नसतील, पण एक तुलनात्मक नियमितपणा आपोआपच जाणवेल.

Regularity ही अनेक गोष्टींमधून दिसते. काही खाली नमूद करत आहे.

 1. पानाच्या चारही बाजुंनी समतोल समास सोडलेला असतो.
 2. Capital आणि small (lower case) अक्षरं ही एकमेकांना शोभतील अश्या प्रमाणात असतात.
 3. संपूर्ण पानाकडे पाहता, अक्षरांचा झुकलेला कल (slant) सुसंगत, वारंवार न बदलणारा असतो.
 4. बऱ्याचशा अक्षरांची उंची मिळती जुळती असते.

एकंदर लेखनाकडे पहाता हस्ताक्षर साधं, समजण्यास सोपं, कुठलीही गुंतागुंत नसलेलं, वाचण्यायोग्य, आणि स्पष्ट व स्वच्छ असेल तर त्यातून नियमितपणा दिसतो. अक्षरांची आखणी उत्तम असेल तर दृष्टीलाही आणि माणूसाचा सहवासही सुखकारक असतो.

Regularity आणि बाकीच्या उत्तम गुणांची एकत्रित मांडणी करता एक मस्त स्वभाव समजून घेता येतो. त्या व्यक्तीमध्ये एक अंतःस्थ स्थिरता जाणवते. सगळीकडेच.. विचारात, भावनांमध्ये आणि कामातही.. अश्या अक्षराचे लोक विश्वसनीय असू शकतात. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये अनावश्यक बदल जाणवणार नाहीत.

Irregular Writing

Irregularity in Handwriting:

हे sample irregularity चं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.

Irregular हस्ताक्षर:

 1. समास असमतोल, एकसारखा नसलेला,
 2. capital आणि lower case अक्षरांचा ताळमेळ नाही. काही लहान काही मोठी.
 3. हस्ताक्षरात विसंगती.
 4. (Slant) भरपूर पुढे मागे होणारी अक्षरं
 5. ओळींमधील अंतर असमान
 6. अक्षरांची उंची कमी जास्त

एकंदर regularity च्या पूर्णपणे विरुद्ध असलेलं अक्षर!

या प्रकारच्या लिहिण्यातून समजतं की लेखक धरसोड वृत्तीचा आहे. स्वतःच्या मतांवर हा ठाम नसतो. अनिश्चित. विचार आणि भावना बदलत रहाण्याची शक्यता जास्त असते. गोंधळलेली व्यक्ती. या व्यक्तींना स्पष्टता नसते. या लोकांनी स्वतःला शिस्त लावलेली नसते आणि आयुष्याचं गणितच ते कदाचित चुकीच्या दृष्टिकोनातून मांडतात.

साचेबद्ध अक्षर

साचेबद्ध अक्षर

अति एकसारखं, साचेबद्ध अक्षर:

हे sample साचेबद्ध लिखाणाचं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.

वर नमूद केल्यापैकी जर रेगुलरीटी/ नियमितपणा असलेल्या हस्ताक्षराच्या सर्वच गोष्टी सातत्याने लागू होत असतील तर ते अति शिस्तबद्ध हस्ताक्षर असते. आपण लावलेला स्वभावाचा अर्थ खरा असेलच याची शक्यता कमी. खूप जास्त एकसारखेपणा आणि अनैसर्गिकपणे दिसणार समान अक्षर हे प्रविण्यानी मिळवता येतं. अश्या लोकांना परिस्थितीशी जुळवून घेताना कमी त्रास होतो आणि spontaneity असते असं ते जगासमोर मांडतात. शक्यतो तो एक प्रकारचा makeup असण्याची शक्यता जास्त असते..

मी वर सांगितलेल्या स्वभाव विश्लेषणांमध्ये काही त्रुटी असलेले स्वभाव तर काही चांगले गुण असलेले स्वभाव कसे ओळखावे हे सांगितलं आहे. पण हस्ताक्षरावरून व्यक्तीला समजून घेताना हे लक्षत ठेवणं गरजेचं आहे की, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्या व्यक्तीला येणाऱ्या अनुभवांमधून ती घडत जाते. बालपणातल्या, तरुण्यातल्या आणि पुढे येत जाणाऱ्या अनुभवांमधून आपण स्वतःला बदलत जातो. जगाशी वागण्याच्या पद्धती आपण बदलतो.. कदाचित मन मानत नसेल पण अनुभवांनी शिकवलं असेल म्हणून आपण ठराविक पद्धतीने react होतो. त्यामुळे हस्ताक्षरावरून labeling करण्यापेक्षा माणूस म्हणून भावना समजून घेणं महत्वाचं. वरच्या मार्गदर्शनावरून स्वतःच्या भावना समजून घ्या आणि इतरांनाही समजून घ्या. आपण कुणालाही वाईट पटकन म्हणू शकतो पण ती व्यक्ती वागण्यामागचं करण समजून घेतलत,संवाद साधला तर माझ्या या लेखाचा उपयोग झाला असं मला वाटेल. सध्या आपल्याला या technology च्या जगात, ‘माणसांनी माणसाच्या भावना समजून घेण्यासाठी’ “संवाद” हा एकच उत्तम मार्ग आहे. त्यासाठीचं हस्ताक्षरविज्ञान (graphology) या विषयावर मी लेख लोहितीये. याचा तुम्हाला उपयोग होईल ही अपेक्षा. माझ्या लेखांचा तुम्हाला उपयोग झाल्यास नक्की Reply द्या. माझ्याशी संवाद साधा. प्रश्न विचारा.. मला नक्कीच आवडेल.

Advertisements

अक्षरे संगती स्वभाव! 2- Slant

Long weekend संपत आला आहे so विचार केला routine चालू व्हायच्या आधी तुम्हाला अजून थोडं graphology बद्दल सांगावं. मागच्या वेळी आपण margins, spacing आणि baseline बद्दल वाचलं. या लेखात आपण slant बद्दल समजून घेऊ.

download.jpg

आपल्या भावनिक प्रतिक्रिया या slant मधून समजतात.

मला वाटत माणसाला समजून घेण्यामध्ये त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया समजून घेणं आणि त्यामागे अडकलेली भावनांची गुंतागुंत लक्षात घेणं गरजेचं असतं. ‘भावनिक गुंता’ ऐकूनच जड वाटतं तर ते समजून घेऊन सोडवायला जाणं तर फारच अवघड! काळजी करू नका, व्यक्तित्वामधील अवघड गोष्टी समजून घेण्यासाठीच तर मानसशास्त्र आहे. आणि graphology हा एक त्यातलाच भाग. व्यक्तीच्या भावना हा एक अविभाज्य भाग असतो माणसाचा. आणि त्या भावना आपण व्यक्त कशा करतो यावर त्याचं व्यक्तीमत्व अवलंबून असत. आपण आनंदी आहोत की दुःखी आहोत हे मनात ठेवणारे काही लोक असतात तर काही लोक पटकन बोलून टाकतात. काही जणांना या भावना स्वतःपाशीच ठेवायच्या असतात तर काहींना स्वतःहून सांगायच्या असतात, त्यांना लक्ष वेधून घ्यायचं असत.

आपले आचार आणि विचार हे व्यक्तिमत्वाचा पाया असतात असं म्हणलं तर वावगं नाही. भावनांमुळे आपण आपल्या आयुष्यातल्या घटनांना आणि माणसांना प्रतिसाद देतो. आपण व्यक्त होतो म्हणजेच आपल्या आतल्या आवाजाला बाहेरच्या जगपर्यंत एका पुलावरून चालत जायला मदत करतो.

आता या भावना माणूस व्यक्त कशा करतो ते आपण अक्षरामधून पाहू शकतो. ते असं:

WhatsApp Image 2018-03-04 at 4.35.27 PM

अक्षरे उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्या बाजूला कललेली/ झुकलेली असतात यावरून तुम्ही व्यक्त कसे होता हे समजतं. जितकी उजवीकडे कललेली अक्षरे असतील तेवढी त्या व्यक्तीचा भावनिक प्रतिसाद देण्याची क्षमता जास्त असते. अक्षरे जितकी मागे, डावीकडे कललेली असतील तेवढा माणूस अलिप्त राहण्याचा जास्त प्रयत्न करतो. सहसा लवकर व्यक्त होत नाही.

WhatsApp Image 2018-03-04 at 5.16.56 PM.jpeg

अक्षरे जास्त उजवीकडे झुकलेली असतील तर माणसाच्या भावना त्याच्या विचार आणि कृतींपेक्षा वरचढ असतात. पण व्यक्त होताना या slant बरोबरच हस्ताक्षर-मधील बाकीच्या facts पाहणं पण गरजेचं असतं.

AB slant:

WhatsApp Image 2018-03-04 at 4.35.27 PM

साधारण 90° मध्ये अक्षर असतील तर त्या व्यक्ती तर्कशुद्ध (logical) असतात. अश्या लोकांचा स्वतःच्या भावना व्यक्त करण्यावर खूप ताबा असतो. सहसा ते भावना पटकन व्यक्त करत नाहीत. खूप क्वचितच त्यांच्या भावना निर्णय घेण्यामध्ये येतात. सहसा त्यांचे निर्णय हे logical जास्त आणि भावनिक कमी असतात. हे शांत स्वभावाचे असतात. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी ते सगळ्या शक्यतांचा विचार करतात. या व्यक्ती योग्य की अयोग्य, यातून पैसे मिळतील का, आपल्या निर्णयाचे परिणाम काय होतील; असा सारासार विचार करून निर्णय घेतात. या व्यक्तींना भावना असतात पण त्या व्यक्त करण्यावर त्या खूप नियंत्रण ठेवतात.

Any Rightward slant:

WhatsApp Image 2018-03-04 at 4.35.27 PM

उजवीकडे झुकलेली अक्षर असतील तर व्यक्ती खूप बोलकी असते. तिला इतरांना मदत करायला आवडतं. स्वतःचा आतला आवाज ऐकून ते react होतात. त्यांचे निर्णय हे भावनांवर आधारलेले जास्त असतात. भावनावश व्यक्ती असतात या. त्यांना संवाद साधण्याची गरज वाटते. भावना व्यक्त करण्याची आवश्यकता असते. अक्षरे जेवढी जास्त उजवीकडे झुकलेली असतील तेवढी ती व्यक्ती जास्त भावनावश असते. या लोकांना अभिप्राय महत्वाचा वाटतो. इतर कोणी अभिप्राय दिल्यावर हे खुश होतात! उजवीकडे झुकलेल्या प्रमाणावरून याचे BC, CD, DE, E+ असे प्रकार आहेत.

या मध्ये बाकीची अक्षरे पाहणे पण तेवढेच महत्वाचे असते. हा लेख एक मार्गदर्शक म्हणून लिहिलेला आहे. यात खोलात जाऊन अजून खूप अभ्यास असतो, तो संपूर्ण अभ्यास एकत्रित करून मगच आपल्याला personality describe करता येते. Slant किंवा मागच्या लेखातील माहिती ही खूप मूलभूत आहे!!

Any leftward slant:

WhatsApp Image 2018-03-04 at 4.35.27 PM

डावीकडे अक्षर झुकलेल्या व्यक्ती या स्वतःला व्यक्त होण्यापासून थांबवतात. अश्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या संरक्षक गरजांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. खूप काळजीपूर्वक वागतात. अश्या व्यक्तींमध्ये भीती किंवा स्वार्थ या भावना जास्त असण्याची शक्यता असते. बाकीच्या अक्षरांबरोबर हे जुळवून पाहावे लागते. या व्यक्तीनी स्वतःच एक कवच बनवलेलं असत त्या मध्ये त्या आनंदी असतात. दुसऱ्यांपेक्षा यांना स्वतःमधून, आतून प्रेरणा मिळते. यांनी भावना दाबून ठेवलेल्या असतात मनामध्ये. अक्षरे जितकी मागे झुकलेली असतील तेवढी जास्त मानसिक भीती लोकांना असते. जितकं अक्षर मागे झुकलेलं तेवढं भावनिक सहभाग कमी असण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये अक्षर किती मागे झुकते त्यावरून FA आणि G असे प्रकार आहेत.

हे वाचल्यावर आपल्याला प्रश्न नक्कीच पडू शकतो की माझं अक्षर नेहमीच बदलत, माग मी कसा आहे? तर सहसा slant बदलत नाही. भावनिक चढउतार, जवळच्या व्यक्तीचं जाणं, किंवा खूप खोलवर रुतेल अशी एखादी घटना झाली तरच slant बदलते.

ज्या लोकांची slant सहसा एकसारखीच राहते अश्या लोकांच्या आयुष्यात भावनिक स्थिरता असते. लोकांशी वागण्यामध्ये फारसे बदल नसतात.

काही लोकं 2-3 प्रकारच्या slants मध्ये लिहितात. ह्या लोकांना निर्णय घेण्यामध्ये त्रास होतो कारण नेहमीच त्यांचं मन एक सांगत असत आणि बुद्धिमत्ता काहीतरी वेगळं सांगते. Logically निर्णय घ्यायचा का emotionally या कोड्यात अडकलेले असतात हे. अश्या लोकांना असुरक्षित वाटायला लागलं तर ते एकदम बंद होतात. बऱ्याचदा बोलता बोलता ते विषय सोडून देतात आणि शरण जाऊन विषय बंद करण्याचा प्रयत्न करतात. हे सुद्धा बाकीच्या अक्षरांबरोबर तपासून पाहणे गरजेचे असते.

व्यक्तीच्या मनातल्या भावना वाचायला शिकायचं असेल तर तुम्हाला या ‘slant’ बद्दल अजून खोलात जाऊन पाहावं लागेल. मदत लागली तर मी आहेच!

तुमच अक्षर इथे पोस्ट करा आणि तुम्ही सांगा slant कुठला? मी चूक की बरोबर सांगीन! करून तर पाहूया जमतंय का तुम्हाला अक्षरावरून स्वतःला समजून घ्यायला…

अक्षरे संगती स्वभाव! (Details about Margins, Spacing, Baseline)

गेल्या काही दिवसात सगळ्यांनी हस्ताक्षरावरून स्वभाव कसा समजू शकतो यावर हजारो प्रश्न विचारले मग विचार केला या महिन्यात कुठल्या अक्षरामधून काय समजत, आम्ही या हस्ताक्षर विज्ञानाचा कसा उपयोग करतो आणि यातील मुख्य संकल्पना काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.
मानसशास्त्रामध्ये स्वभावातील गुणधर्म, वैशिष्ट्य समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. त्याचपैकी Graphology ही एक वैज्ञानिक पद्धत. मानसशास्त्रामधील हस्ताक्षरावरून स्वभाव समजून घेणं ही सगळ्यात पटकन होणारी चाचणी आहे असं आपण म्हणू शकतो.
तर कागदावर लिहिल्या नंतर स्वभाव 2 पद्धतीने समजून घेता येतो.

 1. कागदाकडे लांबून नजर टाकून स्वभाव समजून घेणं
 2. a-z अक्षरांकडे तपशीलवार पाहून स्वभाव पडताळून पाहणं.

आज आपण कागदाकडे पाहून स्वभावाचा येणारा एक आढावा कसा कळेल ते पाहूया. यात मी 3 गोष्टींबद्दल बोलणार आहे.

 1. समास (Margins)
 2. अंतर (Spacing)
 3. अक्षरांखालील दृश्य किंवा अदृश्य रेघ (Baseline)

मी इथे जे काही लिहिणार सांगणार आहे ते एकाच दृष्टिकोनातून आणि ठराविक प्रमाणातच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतीये जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल अक्षरावरून स्वभाव कसा समजून घेता येतो! यात अनेक पैलू आणि वैशिष्ठ्ये अजून असतात. तुमच्यासाठी खास काही tips:
मुळात आपण कागद पेन घेऊन लिहायला बसायचा मूळ उद्देश हा असतो की आपले विचार समोरच्या पर्यंत पोहोचावेत. जर कागदावर स्पष्ट, सुवाच्य अक्षरात लिहिले असेल तर त्या व्यक्तिमत्व बद्दलही आपण तसेच म्हणू शकतो. बऱ्यापैकी स्वच्छ व्यक्तिमत्व! खोलात गेल्यावर बाकीचं कळतंच. ज्या लोकांचं सुवाच्य अक्षर नसतं, अश्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न.
लिहिलेल्या कागदावर एक नजर टाकल्यावर पानाच्या डाव्या बाजूला भूतकाळातील प्रत्त्येक गोष्ट आणि स्वतः बद्दल सांगता येतं. यात पालकांशी असलेलं नात, आपली मानसिकता, बालपण अश्या अनेक गोष्टी कळतात. तर उजव्या बाजूला भविष्यात येणाऱ्या आव्हाहनांना कसे पेलताय आणि इतरांना कसे वागवता हे खोलात जाऊन समजून घेता येत. यात तुमची ध्येय, आत्मविश्वास आणि अनेक गोष्टी पाहता येतात.

 1. समास:

कागदावर लिहिल्यावर चारही बाजुंनी एक समास सोडलेला असतो. यात अंतर सोडण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यावरून व्यक्तीचा स्वभाव ठरतो. समासावरून (margins) माणसाच्या संवाद साधण्याच्या कौशल्यांवर (interaction with other people) आणि कशा पद्धतीने आपण जगतोय यावर लक्ष केंद्रित केलं जातं. यात डावी कडे, उजवीकडे, वर आणि खाली सोडलेल्या अंतरासाठी वेगळे अर्थ असतात. काही लोक कितीही मोठे झाले तरीही आई-वडीलांवर अवलंबून असतात. जगासमोर एकटं, असुरक्षित वाटतं अश्या लोकांना.. सगळी काम स्वतःची स्वतः करतही असतील कदाचित पण सतत कोणाचा तरी आधार लागतो; तर काही लोकं जन्मतःच धडाडी असतात. Risks घ्यायला त्यांना आवडत आणि स्वावलंबी व्यक्तिमत्व असतं!अश्या काही लोकांना समजून घेण्यासाठी या काही टिप्स: डावीकडे सोडलेल्या margin कडे पाहिल्यावर हे 3 प्रकार दिसतात.

new-doc-2018-02-13-page-21.jpg
1. पाहिल्यावर लक्षात येते की असं लिहिणारी व्यक्ती घरच्यांशी खूप connected आहे. ती इतरांवर अवलंबून आहे.

2.या व्यक्ती घरच्यांपासून भावनिक रित्या दूर जात आहेत अस समजतं
3.या प्रकारची लोकं समोरच्या व्यक्तीला, परिस्थितीला कुशलतेने हाताळू शकतात. इथे मग त्यांना खोट बोलावं लागलं तरी ते पुढेमागे पाहत नाहीत.
अश्या प्रकारे उजवीकडे, डावीकडे, वर आणि खालच्या margins वर काम करून त्या व्यक्तीची personality समजते.

 1. अंतर:

काही लोक खूप काम करतात, अनेक parties ला जातात, स्वतःच्या छंदांना वेळ देतात थोडक्यात सगळंच करताना दिसतात.. आपण नेहमी विचार करतो कसं काय जमत असेल हे? त्याचं उत्तर लिहिलेल्या कागदाकडे पाहिल्यावरच कळतं. समान अंतर सोडून, भरपूर गोष्टी, एकमेकांमध्ये न अडकता जर लिहिलेल्या असतील तर ती व्यक्ती वरील वर्णनाप्रमाणे असते!
दोन ओळी, शब्द आणि अक्षर यामध्ये कमी, जास्त किंवा असमान अंतर आहे हे पहाताच क्षणी जाणवतं. या अंतर सोडण्यावरून व्यक्तीचं नियोजन आणि त्या नियोजनाची होणारी अंमलबाजावणी (planning and execution) पाहता येते. त्याची विचार करण्याची पद्धत कळते.

new-doc-2018-02-13-page-2-e1518580744808.jpg

a. दोन ओळींमध्ये एकसारखे अंतर-: नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी उत्तम
b. दोन ओळींमध्ये जास्त अंतर-: नियोजन करायला आणि ते आमलात आणायला खूप वेळ लागतो.
c. दोन ओळींमध्ये असमान अंतर-: बालपण खराब गेल असण्याची शक्यता. आत्मविश्वासाची कमतरता. या व्यक्तींमध्ये नियोजन करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता कमी पडते.
याच प्रमाणे शब्द आणि अक्षरांमधील सोडलेल्या अंतरामधून स्वभाव कळतो. प्रत्येक stroke मधून वेगळे गुणधर्म कळतात.

 1. ओळ, Baseline:

ज्या रेघेचा आधार घेऊन आपण लिहितो (दृश्य किंवा अदृश्य रेघ) ती कशी जातीये त्यावरून स्वभाव ओळखता येतो. यावरून आपल्याला स्वतःवरचा control कळतो. या पेक्षा खोलात जाऊन समजून घ्यायचे झाले तर baseline ही अनियंत्रित असली तरीही खूप महत्त्वाची असते व्यक्तीला समजून घेण्यामध्ये. ज्या घटनांवर व्यक्तीमत्व उभे असते त्या आधारस्तंभाचे चित्रीकरण baseline आपल्या समोर करते. यामुळे माणसाला सत्य परिस्थिती ची असलेली जाणीव समजते. नाती सांभाळण्याचे कौशल्य आणि सर्व भावना एकत्रितपणे तरीही स्पष्ट तुम्हाला मांडता येतात का हे या baseline मधून कळते! फारच पुढचा विचार सांगायचा झाला तर baseline ही सत्य परिस्थिती काय आणि सुप्त मनामध्ये नक्की काय चाललंय याची विभागणी करून आपल्यासमोर मांडते.

New Doc 2018-02-13 - Page 3
i) वर जाणारी ओळ:
असं लिहिणारी लोकं उत्साही, आनंदी, नेहमी काहीतरी चांगलं होईल असा विचार करणारी, आशावादी, कष्टाळू असतात.
ii) खाली जाणाऱ्या ओळी:
या लोकांमध्ये कमी उत्साह असतो. आळशी असतात असही म्हणू शकतो आपण. खिन्न मनस्थिती मध्ये असतात आणि अश्या लोकांच्या आयुष्यात त्यांना न आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत असतात. लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये हे दिसत असेल तर त्यांना बोलतं करण्याची गरज असते. सहसा अश्या व्यक्तीला मनातलं व्यक्त केल्याने मदत होते. काही जणांसाठी हा आयुष्यातला तात्पुरता टप्पा असू शकतो जिथे मदतीची गरज असते. अथवा हे लोक आळशी प्रकारात मोडतात..
लांबून नजर टाकल्यावर कागदावर वरील गोष्टी कळतात तसेच या खालील काही गोष्टी पण कळतात ज्यावर मी पुढच्यावेळी लिहीन. पुढे काय असेल याचा साधारण अंदाज, बघा intersting वाटतंय का…

 • अक्षरे उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्या बाजूला कललेली असतात हे समजून घेणं
 • किती दाब देऊन तुम्ही कागदावर लिहिता हे पहिले जाते. त्याबद्दल माहिती.
 • अक्षरांची जोडणी कुठल्या पद्धतीने होतीये त्यावर स्वभाव कळतो.
 • अक्षराच्या आकारावरूनही स्वभाव कळतो!

वर नमूद केलेली माहिती खूप थोडकी आहे. (Tip of iceberg). व्यक्तिमत्व परीक्षण करण्यासाठी तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे असते. Graphology हा विषय सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना या बद्दल माहिती मिळावी म्हणून मी हे article लिहिले आहे. यातील खोलवर माहिती मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. अथवा contact: 8806222779 भाग्यश्री.
या आणि अश्या अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी वाचत राहा आणि मला feedback देत राहा! मला तुमची प्रत्युत्तर वाचायला नक्कीच आवडेल.

हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाची ओळख

हा लेख awareness साठी लिहिलेला आहे. हा आणि असे बरेच लेख इथून पुढे प्रत्येक महिन्याला लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. चिकित्सक वृत्तीने वाचलं तर प्रत्येकाला यातून स्वतःसाठी महत्वाच काहीतरी मिळेलच. प्रयत्न करून पाहा! आणि हो feedback ची वाट पाहतीये…

तुम्ही हे वाचताय, आणि तुम्ही रोबोट नाहीए, म्हणजेच तुम्ही कधी ना कधी लिहायला शिकला आहात! लिहिताना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का ? एकत्रच, एकसारखं, एकाच वर्गात शिकूनही प्रत्येकाचं अक्षर इतकं वेगळं कसं असतं? कसं काय काही लोकं खूप वळणदार लिहितात तर, काही अगदी मुंगी कागदावरून चालत गेल्या सारखं??!!! काही अगदी सुवाच्य तर, काही खूपच गचाळ, न वाचता येण्या सारखं? तुमच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची गुपितं सोडवण्यासाठी ग्राफोलॉजी हि एक किल्ली आहे. ग्राफोलॉजी मध्ये हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्वाचे, स्वभावाचे परीक्षण केले जाते! तुमच्या अक्षरातून कळणाऱ्या गमती-जमती, काही तुमच्या स्वभावातील गुण दोष जे तुम्हालाही उलगडले नसतील, स्वभाव वैशिष्ठ्ये, तुमचे पैलू तसंच तुम्ही काम वेळेवर करता की पुढे ढकलता या सारख्या अनेक गोष्टी अक्षरातून समजतात! विश्वास ठेवायला अवघड जात असला तरी हे अगदी १००% खरं आहे. हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या या शास्त्राला ग्राफोलोजी (graphology) असे म्हणतात. थोडक्यात माणसाचा स्वभाव आजकाल आपल्याला हस्ताक्षरावरून कळतो! ‘काय आजची पिढी हे नवनवीन शोधून काढून त्यात career करते कोणास ठाऊक?’ अस वाटणाऱ्यांसाठी एक सांगणं आहे, अहो आहात कुठे? हे ४०० वर्ष जुनं शास्त्र आहे! आत्ता कुठे भारताला त्याची जराशी ओळख व्हायला लागलीये. लेखणीतल्या शाईच्या प्रवाहातून कागदावर उमटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारे आम्ही अभ्यासक! हे शास्त्र अगदी कोणालाही शिकता येते, यासाठी वयोमर्यादा नाही.

1cursive_worksheet-12-of-15featured
हस्ताक्षर परीक्षण म्हणजे अक्षरावरून, शास्त्रीय पद्धतीने व्यक्तिमत्वातले गुण-दोष ओळखणे, त्याचे मूल्यमापन करणे व व्यक्तीला समजून घेणे होय. समोरील गंभीर प्रसंगी तुमचे भावनिक प्रतिसाद, एकाग्रता, विचार करण्याची पद्धत, आत्मसन्मान, आत्मविश्वास, स्वसंरक्षणासाठीच्या पद्धती, भीती, करारीपणा, स्वावलंबी आहात की परावलंबी, संवाद कौशल्य, कामातील सातत्य, व्यक्तिमत्वातील अद्वितीय वैशिष्ठ्य या सारख्या अनेक गोष्टी फक्त अक्षराकडे पाहून कळतात!
ग्राफोलोजी म्हणजे काय समजल्यावर साहजिकच मनात प्रश्न निर्माण होतो ह्याचा मला काय उपयोग? तर हे सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे! जसे व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये मनोरंजन म्हणून, नवीन व्यवसाय चालू करताना आपला भागीदार योग्य आहे का? हे समजून घेण्यासाठी, नोकरीसाठी भरती करताना त्या जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी, पोलिसांना मदत, कागदपत्रांच्या परीक्षणासाठी, कोर्टमध्ये न्यायनिवडा करण्यासाठी, समुपदेशकांना समोरील व्यक्तीला त्याच्या नकळत समजून घेण्यासाठी, तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्तिमत्व विकासासाठी याचा वापर होतो. लहान मुलांसाठी अभ्यासाबरोबरच जीवनावश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्व विकसित होणे हे सध्याच्या जीवनात अत्यावश्यक आहे. त्यासाठी ग्राफोलॉजी चा उत्तम वापर होतो. लहान मुलेच कशाला, मोठ्या लोकांनाही सुधारणेची गरज असतेच की! म्हणतात ना Its never too late.
अक्षरात बदल घडवून आणल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा करण्याचा एक सोप्पा उपाय शोधला आहे ग्राफोलॉजीस्टनी. जुनी म्हण होती स्वभावाला औषध नाही पण खरंतर बदलायची मनापासून इच्छा असणाऱ्यांसाठी ‘स्वभावाला औषध आहे!!’ ग्राफो-थेरपीमुळे (अक्षरामधील काही वळणे (strokes) बदलल्यामुळे) स्वभावात बदल होतो, अनेक भीती कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, ध्येय ठरवून त्या पर्यंत पोहोचण्याची योग्य दिशा गवसते, संवाद कौशल्य सुधारतात, समजून घेण्याची तसेच जबाबदारी पेलण्याची क्षमता वाढते, चिडचिड कमी होते, एखाद्या घटनेला कुशलपणे हाताळता येते, नातेसंभंध सुधारतात, व्यक्ती गरज असेल तिथे पुढाकार घेते, इतकेच काय अगदी विविध आज़ार बरे करायलाही मदत होते. ग्राफो-थेरपीमुळे बुजरेपणा कमी होऊन योग्य ठिकाणी योग्य वेळीं आपण स्वतःला व्यक्त करायला शिकतो. या सारखे अनेक फायदे झालेले मी गेली अनेक वर्षे पाहतीये. मी स्वतः निराशेनी ग्रासलेल्या लोकांना परत सकारात्मक विचार करताना पाहिलंय. १२ वी मध्ये बोर्डात, प्रिलिम्स पेक्षा २७% गुणांमध्ये वाढ झालेली पाहिली आहे. २ भिन्न व्यक्तीमत्वच्या व्यक्ती एकमेकांना अनुरूप आहेत कि नाही हे अक्षरावरून कळाले आहे!
ग्राफो-थेरपीमुळे उत्तम व्यक्तिमत्व विकसीत झालेले अनेकजण आज या समाजात वावरत आहेत. स्वतःला प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर सुधारणे खरंच सोप्पे आहे फक्त मनाची तयारी हवी! तुमच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी संधी तुमचा दरवाजा ठोठावत आहे. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या या नव्या पायवाटेवर चालण्याचा प्रयत्न करून बघा तुम्ही आयुष्यात अनेक नवीन यशशिखारे गाठू शकाल !